सूर्य कोपला,उष्माघाताचा आणखी एक बळी

बातमी कट्टा:- उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला आहे.शेतात काम करत असतांना तरुण शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून सदर घटना दि 18 रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अमळनेर तालुक्यातील आटाळे येथील 35 वर्षीय तरुण शेतकरी सुनिल नथ्थु पाटील हे दि 18 रोजी दुपारी शेतात काम करत असतांना सुनिल पाटील यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले.मयत सुनिल पाटील यांची पत्नी गेल्या आठ महिन्यांपूर्वीच एका अपघात मयत झाली होती.त्यांच्या पश्चात आई वडील,भाऊ एक णुलगा एक मुलगी मुलगा असा परिवार होत.

यापूर्वी देखील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील तरुण शेतकऱ्याचा अशाच प्रकारे शेतात काम करत असतांना उष्माघाताने मृत्यू झाला होता.उष्माघात बळीची हि दुसरी घटना घडली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: