सेवानिवृत्तीच्या एक महिन्या आधीच लाचखोर ग्रामविकास अधिकारी ताब्यात…

बातमी कट्टा:- सेवानिवृत्तीच्या एक महिन्या आधीच ग्रामविकास अधिकारीला 11 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.झालेल्या कामाचे बिल शासकीय ठेकेदाराच्या नावे अदा होण्यासाठी लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील वर्डी ग्रामपंचायत येथील पंधरा वित्त आयोगाअंतर्गत निधीतून गटार व ढापे बांधकामाचे काम जळगाव येथील एका शासकीय ठेकेदाराने दि 31-12- 2021 च्या निविदा प्रक्रीयेद्वारे घेतले असून सदरचे काम खर्डी येथील तक्रारदार त्यांच्या कडून सदरचा कामाचा सब ठेका शंभर रुपयाच्या स्टँम पेपर वर दि 11–2-2022 रोजी सब कॉन्ट्रॅक्टर करारनामा करून घेतले होते.

करारनामा प्रमाणे तक्रारदार यांनी सब ठेका घेतलेले कामे पुर्ण केले असुन झालेल्या कामाचे बिल शासकीय ठेकेदाराच्या नावे अदा होणेकरीता तक्रारदार यांनी ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 टक्याप्रमाणे 12,500 रूपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे धुळे पथकाला तक्रार दिली होती.

सदरच्या माहिती वरुन धुळे लाचलुचपत पथकाने सापळा रचत ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 12,500/- रूपयांची मागणी केली.तडजोडीनंतर अकरा हजारांची लाच स्विकारतांना ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.व त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ग्रामविकास अधिकारी भगवान यहिदे हे अवघे एक महिन्याने 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त होणार होते.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण,शरद काटके,राजन कदम,संतोष पावरा,पोकॉ मोरे,सुधीर मोरे यांनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: