सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाचखोर बीडीओ जाळ्यात…

बातमी कट्टा:- सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.गटविकास अधिकारींसह सहाय्यक लेखा अधिकारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय डी.शिंदे हे आज दि 31 रोजी सेवानिवृत्त होणार होते.याबाबत दि 1 रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.सेवानिवृत्त कार्यक्रमाचे पत्रीका देखील वाटप झाल्या होत्या.

मात्र आज दि 31 रोजी सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिताफीने ताब्यात घेतले आहे.गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे या कर्मचारीला पाच हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.

अर्जदार हे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या तक्रारीवरुन आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे.तक्रारदार यांची पी एफ कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून कारवाई केली आहे. दुपारी उशीरापर्यंत कारवाई सुरू आहे.

WhatsApp
Follow by Email
error: