“सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय”भारतीय सेनेतील जवानाची आत्महत्या…

बातमी कट्टा:- “सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय” अस लिहुन सुसाईड नोट व व्हिडीओ भाऊला पाठवत 25 वर्षीय भारतीय सेनेतील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबळजनक घटना घडली आहे.त्यांच्यावर आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

धुळे तालुक्यातील लामकानी येथील भारतीय सेनेतील जवान गोरख नानाभाऊ शेलार ऊर्फ गौतम वय २५ हे भारतीय सेनेत पुणे येथील आर्मड फोर्स मेडिकल कॉलेजात शिपाई पदावर होते.चार वर्षा पुर्वी २०१७ साली भारतीय सैन्यात गोरख हे भरती झाले होते.गावात नम्र आणि शांत स्वभावी म्हणून त्यांची ओळख होती.त्यांनी काल सकाळी ड्युटीच्या ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली.

जवान गोरख यांनी गळफास घेण्यापूर्वी भाऊ केशवला व्हिडीओ व सुसाईड नोट पाठवली होती.”सॉरी आबा तुम्हाला न सांगताच जातोय” अशी सुरुवात करत मोठा भाऊ केशवला व्हिडिओ आणि सुसाईट नोट पाठवून गळफास घेतला. ड्युटीच्या ठिकाणी आत्महत्येची घटना घडल्याने त्यांच्या युनिटतर्फे संपूर्णता चौकशी सुरु आहे.

व त्यानंतर गोरख यांचे शवविच्छेदन करून दुपारी प्रेत ताब्यात देण्यात आले. गोरख यांचे वडील नानाभाऊ तानका शेलार हे शेतकरी होते.परंतू त्यांनी देखील यापूर्वी कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली होती.आणि आता गोरख यांनी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्याची घटना समजताच लामकानी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: