
बातमी कट्टा:- देशभरातून हजारो भाविक आयोध्या येथील श्रीराम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा येथे पोहचत आहेत. यासोबतच देशातील विविध प्रसिद्ध वस्तूही आयोध्या येथील श्री राम मंदीराच्या चरणी पोहचत आहेत.
व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/Uba24qQd9dSKN3pp/?mibextid=qi2Omg
यात धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील कारागिरांनी बनविलेले पुजेसाठी लागणारे तांब्यांचे दोनशे कलश आयोध्या येथे पोहचले आहेत. तर काही वेगळे कलशांचे काम सुध्दा युध्द पातळीवर सुरु आहेत.
आयोध्या राम मंदीर कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्रीगोविंददेव गिरी महाराज सोबतच गणेश्वर शास्त्री द्रवीड,प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आचार्य लक्ष्मीकांत दिक्षीत,केशव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल केले यांनी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील बिपीन कासार व गावातील काही कारागिरांना कलश बनवण्याची जबाबदारी दिली आहे.
फेसबुक व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://www.facebook.com/share/v/Uba24qQd9dSKN3pp/?mibextid=qi2Omg
सोनगीर येथे बनत असलेले कलश आयोध्या येथील राम मंदीरात पोहचत असल्याचा अभिमान असून खऱ्या अर्थाने आमच्या कामाची चिज झाली. यामुळे सोनगीर गावाच्या नावाची ख्याती सर्वत्र पसरणार असल्याचे कारागीर बिपीन कासार यांनी यावेळी सांगितले.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/Uba24qQd9dSKN3pp/?mibextid=qi2Omg