सोने चांदीच्या दुकानात कामाला असलेल्या कामगारांचा 72 लाखांचा डल्ला

बातमी कट्टा:- सात ते आठ वर्षांपासून विश्वासू म्हणून सराफ दुकानात कामाला असलेल्या कामगारांनीच विश्वासघात करत 72 लाखांच्या सोने व चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत राजस्थान येथील दोन्ही संशयितांविरुध्द पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

मिळालेल्या माहिती नुसार धुळे येथील प्रकाश जोरावरमल चौधरी वय 55 यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,प्रकाश चौधरी यांची धुळे शहरातील सुवर्ण पॅलेस नावाचे सोने चांदीचे दुकान आहे.गेल्या 17 ते 18 वर्षांपासून तेथे सोने चांदीचे त्यांचे किरकोळ व होलसेल खरेदी व विक्रीचा व्यवसाय आहे. दुकानात ईतर कामगारांसोबत सोन्याचे व्यवहाराची स्टॉकची देखरेखची जबाबदारी शांतीलाल हमिराम कलबी याला देण्यात आली होती तर चांदी डब्बा स्टॉकची देखरेखची जबाबदारी हितेश दिनेशकुमार जोशी हा सांभाळत होता.दर महिन्याला स्टॉक तपासणी करण्यात येत असते.मार्च महिन्यातील सोन्या चांदीची स्टॉक बरोबर होता.

मात्र दि 9 एप्रिल रोजी दुकानातील स्टॉक घेण्यासाठी सांगितले असतांना दुकान मालक फिर्यादी प्रकाश चौधरी व त्यांचे भाऊ सरदारमल चौधरी यांना लक्षात आले की स्टॉकमध्ये 32060 ग्रँम चांदी व सोन्याच्या स्टॉक मध्ये 803-180 ग्रँम दागिना व 200 ग्रँम लगड कमी येत असल्याचे समजले.याबाबत स्टॉकची जबाबदारी सांभाळणारे शांतीलाल हमिराम कलबी व हितेश दिनेशकुमार जोशी यांची कसून विचारपूस केली असता दोघांनी कबुली दिली की सोने व चांदीचे दागिने घेतले असून यात दुकनातील आणखी एक कर्मचारी किशोर नटवरलाल कोली याचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

हितेश जोशी व शांतीलाल यांनी चौकशी केली असता दि 16 /4/2022 पर्यंत घेतलेले दागिने परत आणून देऊ असे सांगितले होते.मात्र दि 13/4/20216 रोजी यातील हितेश जोशी याने आत्महत्या केली तर शांतीलाल कलबी हा त्या दिवसांपासून फरार आहे.दि 1 एप्रिल ते 9 प्रिल या नऊ दिवसात दुकनातील 71 लाख 64 हजार 400 रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने घेऊन पसार झालेले शांतीलाल हमीराम कलबी रा.मंडार ता.रेवडर जि.सिरोही राज्य राजस्थान व किशोर नटवरलाल कोली रा.पिथापुरा ता.रेवदर जि.सिरोही राज्य राजस्थान दोन्ही कर्मचाऱ्यांविरूद्ध आझादनगर पोलीस स्टेशनात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: