स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षणाचे आयोजन,जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

बातमी कट्टा: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी , कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पीएसआय-एसटीआय-अेएसओ (अराजपत्रित) गट-ब पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्याकरिता ‘सारथी’मार्फत या ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाते. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल.

पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने तज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी आणि प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: