“स्पेशल 26 लुट” सिबीआय सांगत 1 लाखांची लुट….

बातमी कट्टा:- स्पेशल 26 हा हिंदी चित्रपट आपण सर्वांनी बघितलाच असेल यात तोतया अधिकारी हायप्रोफाईल घरांवर छापा टाकून पैसे लुटण्याचा प्रकार दाखविण्यात आल होता.आता धुळ्यात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.सिबीआय असल्याचे सांगत सेवानिवृत्त शिक्षकाला 1 लाख 8 हजार रुपयाचा गंडा घातला आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरातील नेहरु चौकातून मधुकर भाऊराव खैरणार वय 72 हे काल दि 8 रोजी सकाळी जात असतांना समोरुन मोटरसायकलीने दोन अज्ञात व्यक्ती मधुकर खैरणार यांच्याकडे येऊन थांबले आणि खैरणार यांना सांगितले की,आम्ही सिबीआयचे माणसे आहोत पुढे धाड पडली आहे.असे सांगुन दोघांनी खैरणार यांच्या अंगावरील गळ्यातील 30 ग्रँम वजनाची गोफ,6 ग्रँम वजनाची अंगठी, असा एकुण 1 लाख 8 हजार किंमतीचे दागिने काढून रुमालात बांंधून देण्याचा बाहाणा केला.व ते दोघेही संशयित तेथून पसार झाले.

मधुकर खैरणार यांनी रुमाल तपासला असता त्यात दागिने नसुन आपली लुट झाल्याचे त्यांना लक्षात आले.त्यांनी तात्काळ देवपूर पोलीस स्टेशन येथे दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: