“स्वत:ला वाचवा व इतरांना वाचवा” उपक्रम,अस्थी व सांधे आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रम…

बातमी कट्टा:- दरवर्षी ४ ऑगस्ट हा दिवस अस्थी व सांधे आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान अस्थी व सांधे आरोग्यावर विविध उपक्रमांचे आयेाजन अस्थीरोग सर्जन सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात.यंदाही या आठवडयात स्वत:ला वाचवा व इतरांना वाचवा हा उपक्रम राबविणार आहे. अशी माहिती अस्थीरोग सर्जन सोसायटी धुळे यांनी दिली आहे.

२०१८ च्या जागतिक आकडेवारीनुसार १९९ देशांपैकी रस्ते अपघातात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. भारताखालोखाल अमेरिका आणि चीन यांची आकडेवारी आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात एकूण ४ लाख ४९ हजार ००२ इतके अपघात झालेले आहेत. त्यात १ लाख ५१ हजार ११३ लोकांचा मृत्यू झालेला आहे. ४ लाख ५१ हजार ३६१ लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत. १८ ते ४५ या वयोगटातील तरूणांचे प्रमाण अपघातात ६९.३ टक्के इतके आहे. १६ ते ६० या वायोगटातील नागरिकांचे प्रमाण ८४.३ टक्के आहे. यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर योगय प्रकारे प्रथमोपचार, वैद्यकीय मदत न मिळाल्याने पहिल्या एका तासात झालेले आहेत. अपघातानंतर दिले जाणारे प्रथमोपचार याचे प्रशिक्षण सहजरित्या देता येवू शकते. महाराष्ट्र अस्थीरोग संघटनेच्या वतीने असे जीवनरक्षक व प्रथमोपचार प्रशिक्षण महारार्ष्टभरातील लाखो विद्यार्थी व पोलीस यांना दयायचे ठरविले आहे. तब्बल १ लाख जीवनरक्षक तयार करण्याचा मानस अस्थीरोग संघटनेचा आहे.१ ते ७ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रभर अस्थीरोग संघटनेचे सदस्य असे प्रशिक्षण देणार आहे. केवळ इतकेच नव्हे तर देशभर अस्थीरोग संघटना विविध उपक्रम राविणार आहे. तरी या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे अवाहन राज्य अस्थीरोग सर्जन सोसायटी अध्यक्ष डॉ.अजित शिंदे, सचिव डॉ.एन.जे.कर्णे तसेच अस्थीरोग सोसायटी धुळेचे अध्यक्ष डॉ. वाय.जे.महाले, डॉ. अमित चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. एन. बी. गोयल यांनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: