
बातमी कट्टा:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा संवर्धन होत नसून स्वराज्याचा इतिहास सांगणारे गडकोट किल्ल्यांच संवर्धन केव्हा करणार? असा थेट सवाल छत्रपती संभाजी राजे यांनी सरकारला विचारला आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुर्वसंध्येला छत्रपती संभाजी राजे यांच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाच्या उदघटनासाठी छत्रपती संभाजी राजे धुळे येथे आले होते.धुळ्यात गल्ली क्रमांक सहा मध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी राजे यांच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. यावेळेस त्यांनी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे हे उद्घाटन केले.उद्घाटन प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेस स्वराज्याचा इतिहास सांगणारे गडकोट किल्ल्यांच संवर्धन केव्हा करणार? असा थेट सवाल सरकारला विचारला आहे.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा संवर्धन होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. या सर्व गड किल्ल्यांच संवर्धन झालं पाहिजे जेणेकरून शिवाजी महाराजांचा इतिहास हा जिवंत राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्षाच्या निकालाबाबत प्रश्न विचाराला असता यावेळेस छत्रपती संभाजी राजे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर ही भाष्य केले. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यामुळे ज्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालेला आहे, त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच कोणाला काय चिन्ह मिळाले याच्याशी जनतेला काही घेणे देणे नाही, जणतेला विकास हवा आहे. गेली अडीच वर्ष अस्थिर सरकार होते, त्यामुळे विकास रखडला, आता नव्या सरकारने विकास काम करून दाखवावीत असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.