स्वर्ण पॅलेस मधून लाखोंची चोरी करणाऱ्या दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात…

बघा व्हिडीओ

बातमी कट्टा:- धुळे येथील सराफ दुकानात लाखोंचे दागिने व रोकड घेऊन फरार झालेल्या संशयितांपैकी दोन संशयितांना आझादनगर पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.तर तिसरा मुख्य संशयित फरार असून पोलीसांकडून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

धुळे शहरातील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस या सराफ दुकानात दि. ९ रोजी जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत तब्बल ८९ लाखांचे सोने चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी आझादनगर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांकडून घटनेचा तपास सुरु असतांना आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारींनी जालना शहरात किशोरसिंग रामसिंग टाक (वय २५ रा. गुरुगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना) यास ताब्यात घेत त्याची केली असता चौकशीत त्याने हा गुन्हा इतर दोन साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने दुसरा संशयित झेनसिंग ऊर्फ लकी जिबनसिंग जुनी (वय २८ रा. नवनाथ मंदिराजवळ, जळगाव) याला जळगाव शहरातून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून ६० हजार रुपयांची १ किलो २० ग्रॅम वजनाच्या चांदिच्या पट्टी स्वरूपात ५ लगड, ७२ हजारांची १४.४३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या ३ लगड, ४० हजारांची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.संशयित किशोरसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये तब्बल ३१ घरफोडी जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर तिसरा मुख्य संशयित फरार असून पोलीसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

On YouTube

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोहेकाँ योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदिप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार व पारेराव यांच्या पथकान केली.

WhatsApp
Follow by Email
error: