स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा प्रयत्न

बातमी कट्टा:- न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्याने आज स्वातंत्र्यदिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.नुकसान भरपाई मिळत नसल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरुध्दात शिंदखेडा तालुक्यातील आरावे येथील शेतकरी शहादु तांबे शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला असता वेळीच पोलीसांनी ताब्यात घेतल्याशे अनर्थ टळला आहे.

व्हिडीओ वृत्तांत बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब करा

मिळालेल्या माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी शहादु निवृत्ती तांब हे शेतीसह मेंढपाळाचा व्यवसाय करतात.येथील शेवाळे शिवारात त्यांची शेतजमीन आहे.शहादु हे मेंढपाळ व्यवसायासाठी बाहेर गावी होते. त्यावेळी रस्ता रुंदीकरणासाठी शासनाच्या संबधित ठेकेदाराने त्यांच्या शेतातील लाखो ब्रास माती खोदुन शेती उध्दवस्त केली.त्यानंतर त्यांनी भरपाईसाठी प्रशासनानेकडे दाद मागीतली गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर योग्य कारवाईचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते.मात्र तरी देखील न्याय मिळाला नाही म्हणून शेतकरी शहादु यांनी कंटाळून स्वातंत्र्यदिनी आत्मदहनासाठी दाखल होऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.यावेळी उपस्थित पोलीसांनी लागलीच ताब्यात घेतले.यामुळे परिसरात काही काळ गैंधळ निर्माण झाल होता.

WhatsApp
Follow by Email
error: