स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जि.प शाळेत माजी सैनिकांचा सत्कार, तर विविध कार्यक्रम…

बातमी कट्टा:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ निमित्त जि.प.केंद्र शाळा जातोडे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.गावातील भारतीय सैनिक सतिश खुशाल लांडगे व लहान भाऊ माजी सैनिक सचिन खुशाल लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.

शिरपूर तालुक्यातील जातोडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातीलच
माजी सैनिक सचिन खुशाल लांडगे व त्यांचे बंधू सतिश खुशाल लाडंगे यांचा ग्रा.प.जातोडे व जि.प.केंद्र शाळा जातोडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग व सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शालेय गणवेश वाटप करण्यात आले तर शाळेत रक्षाबंधान सण सजरा करत वृक्षारोपन करण्यात आले.या कार्यक्रमाला वनावल गटाचे जि.प सदस्य सौ.अभिलाषा भरत पाटील व माजी पं,स सदस्य भरत भिला पाटील ,पंचायत समिती सदस्य सौ.विठाबाई निंबा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी,परिसरातील राजकीय पदाधिकारी व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: