बातमी कट्टा (ग्राउंड रिपोर्ट):-
गावावर आलेल्या समस्येला तोंड देत एका महिला सरपंच यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे.ऐन कोरोना काळात ग्रामपंचायतीला महावितरण विभागाने दिलेल्या 84 हजाराचा दंड महिला सरपंचांनी स्वताचे मंगळसूत्र व दोन अंगट्या मोडून त्या पैशांनी दंड भरला आहे.त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दभाशी येथे पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या होती.तीन ते चार दिवसाच्या कालावधीत गावाला पाणी उपलब्ध होत होते.2019 साली गावाच्या लोकनियुक्त सरपंचपदी नंदीनी विकास पाटील या उच्चशिक्षीत महिला विराजमान झाल्या.सरपंच नंदीनी पाटील यांनी गावातील समस्यांवर लक्ष देत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले गावासाठी सगळ्यात मोठी समस्या होती ती म्हणजे पाणीची समस्या! सरपंच नंदीनी पाटील यांनी आमदार जयकुमार रावल यांच्या मार्फत गावातील पाणीची समस्या सोडवत गावात तीन ठिकाणी मोटरीने पाणी पुरवठा सुरळीत केला आणि आता गावात एक दिवसात दोन वेळा पाणी उपलब्ध झाले आहे.
गावात क्षार युक्त पाणी पुरवठा होत असल्याने गावातील नागरिक परेशान होते.त्या क्षारयुक्त पाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.तो प्रश्न देखील मार्गी लावत सरपंच नंदीनी पाटील यांनी गावासाठी आर.ओ. फील्टर प्लांट उपलब्ध करुन दिला.यामुळे गावातील ग्रामस्थांची क्षारयुक्त पाणी पिण्यापासुन सुटका होणार होती. या आर.ओ.प्लांट प्रकल्पाची तपासणी दरम्यान विजेच्या तारांवर विज कनेक्शन घेण्यात आले होते.गावातील विरोधकांनी याची शुटींग काढून महावितरण विभागाच्या नाशिक व जळगाव येथील कार्यालयाला पाठवत विज चोरी बाबत तक्रार केली.यावर नरडाणा महावितरण विभागाने विज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला 84 हजार 80 रुपयांचा दंड ठोटवला.यामुळे लोकांना पुन्हा गावाच्या पाणीची समस्या उदभवली.
सरपंच नंदीनी पाटील व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रमुखांनी हा दंड भरण्यासाठी गावातून घरपट्टी व पाणीपट्टी वसुल करण्याचा विचार केला.मात्र कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत लोकांकडे पैसे उपलब्ध नाहीत.शेतकरी किंवा मोलमजुरी करणाऱ्यांची अवस्था बिकट असल्याने ते पाणीपट्टी व घरपट्टी भरू शकत नाहीत यामुळे सरपंच नंदीनी पाटील यांनी घरात चर्चा करुन स्वताचे मंगळसूत्र व दोन अंगठ्या देऊन त्या आलेल्या पैशांनी दंड भरला.त्यांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र आता नंदीनी पाटील यांचे कौतुक होत आहे.
नंदिनी पाटील सरपंच (दभाशी शिंदखेडा)
गावाच्या विकासासाठी व गावातील जनेतेच्या समस्यांसाठी कुठलाही विचार न करता दभाशी ग्रामपंचायत व मी आणि माझे पती विकास पाटील हे सदैव कट्टीबध्द आहोत.