स्व. खा. मुकेशभाई पटेल यांना स्मृतीदिना निमित्त अभिवादन

बातमी कट्टा:- येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे आश्रयदाते, मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळचे माजी अध्यक्ष, माजी खासदार स्व. मुकेशभाई रसिकलाल पटेल यांच्या 21 व्या स्मृतीदिना निमित्त गुरुवार दि. 15 जून 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डींग मधील “राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल” मध्ये सामूहिक श्रद्धांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर यांनी गुलाबपुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली व प्रतिमा पूजन केले.

“हे राम”…….भजन सोबत धार्मिक संगीतमय वातावरणात माजी खासदार स्व. मुकेशभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक बबनलाल अग्रवाल, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, कमलकिशोर भंडारी, शिरपूर पिपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, कैलासचंद्र अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सुभाष कुलकर्णी, नगर परिषद अभियंता माधवराव पाटील, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, श्रेणिक जैन, काशिनाथ राऊळ, नितीन गिरासे, अशोक कलाल, भटू माळी, फिरोज काझी, जाकिर शेख, दिलीप लोहार, श्यामकांत ईशी, विजयसिंग गिरासे, विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे संचालक, शहर व तालुक्यातील नागरिक, पदाधिकारी, संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनीही गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्राचार्य आर. बी. पाटील यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: