हाणामारीत एकाचा मृत्यू,गुन्हा दाखल…

बातमी कट्टा:- साक्री तालुक्यात निजामपूर जैताणे गावात रात्री दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली,या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे,जखमीवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

निजामपूर जैताणे येथील मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात सुरुवातीला बाचावाची झाली व या बाचावाचीचे रूपांतर नंतर दोन गटात हाणामारी मध्ये झाले.या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह हा काही काळ निजामपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर आणून ठेवला होता, जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना ताब्यात घेण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवणार नाही अशी काहीशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती, परंतु पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ संबंधितांना अटक करण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली. सध्या संपूर्ण गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनातर्फे फौजफाटा तैनात करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची संपूर्ण काळजी पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे, त्याचबरोबर कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे,

WhatsApp
Follow by Email
error: