
बातमी कट्टा:- जुन्या भांडणाच्या कुरापतीतून झालेल्या हाणामारीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.नरडाणा जवळील जातोडे येथे दि 29 डिसेंबर रोजी दोन गटांत हाणामारी झाली होती.यात एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि 7 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी वाढीव कलम नुसार पोलिस पाटीलसह 11 जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि 29 रोजी शिंदखेडा तालुक्यातील जातोडा येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली होती.यात मिय्यालाल नसीर पटेल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मिय्यालाल पटेल यांची पत्नी बानोबी मिय्यालाल पटेल (रा. जातोडा) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादीत म्हटल्यानूसार मागील भांडणाच्या वादातून जातोडे येथील पोलिस पाटील फारूक निंबा पटेल याने मिय्यालाल पटेल यांना लाकडाने मारहाण केली. त्यात ते पडल्यानंतर बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच बानोबी पटेल यांचा मुलगा अरमान पटेल,जुबेर पटेल, पुतण्या फिरोज पटेल यांनादेखील फारूक पटेल याच्यासह आसिफ निंबा पटेल, वसीम सलीम पटेल, दानिश शकील पटेल, शकील निंबा पटेल, अत्ताफ गनी पटेल, सलीम निंबा पटेल, भिक्या हबीब पटेल, साबीर हबीब पटेल, नदीम सलीम पटेल, सलीम हुसेन पटेल सर्व रा. जातोडा यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. बानोबी यांची सून रुबिना भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून गहाळ झाली.भांडण सोडविल्यानंतरही शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिल्याचे नमूद करत 11 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.मिय्यालाल पटेल यांच्या वर धुळे येथे उपचार सुरू असताना दि 7 रोजी मृत्यू झाला. त्यावरून या गुन्ह्यात वाढीव खुनाचे कलम लावण्यात आले आहेत.