हिंस्त्र प्राणीचा धुमाकूळ ,तीन ते चार बकऱ्यांचा पाडला फडशा…

बातमी कट्टा:- रात्रीच्या दरम्यान हिंस्त्र प्राणीने तब्बल पाच शेळ्यांचा(बकरी) फडशा पाडल्याची घटना दि 15 रोजी घडली आहे.तर दोन शेळ्या जखमी अवस्थेत आहेत.या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी वनविभाग दाखल होत पंचनामा करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील गुर्हाळपाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या थुवानपाणी येथे नानटा लालसिंग पावरा यांच्या मालकीच्या शेळींवर वन्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला या हल्ल्यात चार ते पाच शेळ्यांचा फडशा पाडलेला असून दोन शेळ्या जखमी अवस्थेत आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाच्या पथक दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. घटनास्थळी पाऊस पडल्याने वन्यप्राण्याचे पायाचे ठस्से घेणे शक्य होऊ शकले नसल्याने वन्यप्राणी कोणता ? हे वनपथकाला समजू शकलेले नाही.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या अगोदर देखील या परिसरात अशा पध्दतीने हिंस्त्र पाण्याने शेळींचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: