हिसाळे वि.का.सोसायटीच्या निवडणूकीत माजी उपसभापती संजय पाटील ठरले किंगमेकर, चुरशीच्या लढाईत मारली बाजी

बातमी कट्टा:- काल दि.11 रोजी हिसाळे येथील वि. का. सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अमरिषभाई व तुषार रंधे यांच्या नेतृत्वात भाजपा प्रणित नम्रता पॅनल विजय झाला. माजी. उपसभापती संजय पाटील व उपसरपंच विकास पाटील, संतोष परदेशी यांच्या नेतृत्वाखाली नम्रता पॅनल उभे केले होते.

त्या विरोधात भाकप व आघाडी तर्फे सहकार वाचवा पॅनल उभे करण्यात आले होते. सहकार वाचवा पॅनल तर्फे गावात अनेक प्रचारसभा घेऊन निवडणूकित चुरस निर्माण केली होती.मात्र मतदारांचा संपूर्ण कौल नम्रता पॅनल कडे असल्याने त्या चुरशीच्या झालेल्या निवडणूकीत नम्रता पॅनल चा विजय झाला आहे. नम्रता पॅनल ने 13 पैकी 13 उमेदवार विजयी होऊन सत्ता अबाधित ठेवली आहे.
विजयी झालेल्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :-
1) पाटील जनाबाई दिलीप :- 212 मते
2) पाटील स्वाती विकास :- 206 मते
3) करंकाळ जितेंद्र श्रीधर :- 204 मते
4) पाटील बाळू कौतीक :- 195 मते
5) पाटील संजय संतोष :- 176 मते
6) खैरनार भिका सीताराम :- 175 मते
7) पाटील वसंत कौतीक :- 174
8) पाटील ज्ञानेश्वर गंगाराम :- 173 मते
9) पाटील दिपक सुरेश :- 171 मते
10) जैन माणिकचंद मिश्रीलाल :- 171 मते
11) परदेशी प्रताप नारायण :- 169 मते
12) परदेशी संतोष शिवलाल :- 164 मते
13) जाधव वसंत रामसिंग :- बिनविरोध

सर्व विजयी उमेदवारांचे मा. अमरिषभाई पटेल व जि. प. अध्यक्ष ना. तुषार रंधे यांनी अभिनंदन केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: