हॅलो बँकेतून बोलतोय,केवायसीच्या नावाने 9 लाखांचा गंडा…

बातमी कट्टा:- बँकेतून बोलत असल्याचे सांगून आरोग्य कर्मचाऱ्याला सुमारे 9 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.याबाबत अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवपूरातील नकाणेरोड परिसरात राहणाऱ्या महेश अहिरराव यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल वर अज्ञात व्यक्तीने एसबीआय बँकेतून राजेश श्रीवास्तव बोलत असून केवायसीसाठी माहिती लागेल असे सांगितले होते. त्यावर महेश अहिरराव यांनी सर्व माहिती त्यांना दिली,जन्म तारखेपासून तर बँक एटीएम कार्ड व ओटीपीचा कोड फोनवर दिला त्यानंतर काही वेळाने महेश अहिरराव यांच्या बँक खात्यातील सुमारे 8 लाख 94 हजार 769 रूपयांची रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आले.याबाबत अहिरराव यांनी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांशी संपर्क साधला आहे.महेश अहिरराव हे आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: