
बातमी कट्टा:- हॉटेल मध्ये सिलींग फॅनजवळ काम करतांना सफाई कर्मचारीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर संतप्त जमावाने हॉटेल मालकाच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना आज दि २२ रोजी दुपारी १२ वाफेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील लालबाग मधील लकी बियर बार येथे मोसीम इस्माईल मेहतर वय २५ हा गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाईचे काम करत होता.आज दि २२ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोसीम मेहतर हा बियरबार हॉटेल मध्ये फॅन जवळ काम करतांना अचानक शॉक लागल्याने तो खाली कोसळला. त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी मोसीम मेहतर याला तपासून मृत घोषित केले आहे.घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात असलेली हॉटेल मालकाच्या एम एच १८ बि एच ५५५८ क्रमांकाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली.घटनास्थळी शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील, उपनिरीक्षक संदीप दरवडे सह शोध पथकाचे पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.मोसीम मेहतर यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,वडील व मोठा भाऊ असा परिवार होत.
