२० हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक…

बातमी कट्टा:- २० हजारांची लाच स्विकारतांना शिंदखेडा भूमी अभिलेख विभागाच्या छाननी लिपीकला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. धुळे उपअधीक्षक भूमी अभिलेक कार्यालयात कारवाई करण्यात आली असून धुळे शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांनी उपअधिक्षक,भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा जि. धुळे येथे त्यांनी करार करून काम घेतलेल्या बेटावद गावातील ४ शेत जमिन गटाचे हद्द कायम पोट हिस्सा मोजणी करिता अती तातडीचे चलन भरुन शेत मोजणीचा अर्ज सादर केला होता.सदरचे काम करुन देण्यासाठी शिंदखेडा भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक सुशांत शामप्रसाद अहिरे वय ३६ यांनी तक्रारदार याना दि. ११/११/२२ रोजी ४० हजार रुपयांची मागणी करुन त्याच दिवशी २० हजार रूपये रोख स्वीकारून उर्वरित २० हजार रूपये काम केल्यावर देण्यास सांगुन दिनांक १४/११/२२ रोजी व दिनांक ६/१/२३ रोजी पडताळणी दरम्यान २० हजार रूपये घेण्याची समंती दर्शवून आजद दि ८ रोजी उप अधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय धुळे येथे २० हजार रूपयांची लाच स्वीकारताना सुशांत अहिरे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक ला प्र वि जळगांव सापळा अधिकारी- पो.नि.एन.एन.जाधव,सहसापळा पथक पो.नि.संजोग बच्छाव* ASI.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,पो.ह. अशोक अहिरे,पो.ना. ईश्वर धनगर,बाळू मराठे,पो.ना. महाजन पोकॉ.अमोल सूर्यवंशी,पो. कॉ. प्रणेश ठाकूर आदींनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र,नाशिक, एन.एस. न्याहळदे,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.नरेंद्र पवार, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: