बातमी कट्टा:- घरफोडी करून 11 लाखांची रोकडसह सोन्याच्या दागीने चोरी करून गुजरात राज्यात पळून गेलेल्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातील 11 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि 29 रोजी धुळे येथील इमरान शेख सलीम रा.सुल्तानीया मदरसा,जामचा मळा यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनात फिर्याद दिली होती त्यात म्हटले होते कीषदि 28 रोजी रात्री 10 ते 29 रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान त्यांचे बंद घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले 11 लाख 10 हजार रुपये रोख व 11 ग्रँम वजनाचे सोन्याचे दागीने अस एकुण 11 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाल्याचे नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांशी स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाला सुचना दिल्या.याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास करत असतांना अकबअली उर्फ जलेलेल्या कैसरअली शहा रा.जामचा मळा,धुळे याला गुजारात राज्यातील सुरत बारडोली येथून ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्याच्या ताब्यातील 11 लाख 28 हजारांची रोकड व 20 हजार किंमतीचे मंगळसूत्र व कानातील झुमके असा एकुण 11 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, योगेश राऊत,रफीक पठाण,संजय पाटील,श्रीकांत पाटील,प्रभाकर बैसाणे,गौतम सपकाळे,राहुल सानप,कमलेश सुर्यवंशी,राहुल गिरी आदींनी कारवाई केली आहे.