15 हजार रुपयांची लाच मागणारा “वनपाल” ताब्यात..

बातमी कट्टा:- मनपा मार्फत तोडण्यात आलेल्या झाडांची लाकडे वाहनात भरून घेऊन जात असतांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धुळे वनविभागाच्या कार्यालयात लाकूड घेऊन जाणारे वाहन जमा केले होते.जमा असलेले वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराने विनंती केली असता वनपाल यांनी 15 हजाराची लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपाल विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील दत्तमंदिर देवपुर येथील कॉलनीतील रस्ता रुंदीकरणाचे कामी धुळे मनपा मार्फतीने अडथळा निर्माण करणारी तोडलेल्या झाडांची लाकडे तक्रारदार यांचा मुलाने वाहनात भरुन धुळे येथील पारोळा चौफुली कडुन धुळे शहरात घेऊन येत असतांना काटा मार्केट जवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते वाहन अडवून धुळे येथील वनविभागाच्या कार्यालयात जमा केले होते.

त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे येथील वनविभागाच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या जमा असलेल्या मालवाहतुकीचे वाहन सोडवण्यासाठी धुळे वनपाल सुनिल पाटील यांची भेट घेतली यावेळी वनपाल सुनिल पाटील यांनी वाहन सोडवण्यासाठी 15 हजारांची मागणी केल्याने तक्रारदार यांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीनुसार दि 6-5 – 2022 रोजी पडताळणी केली असता वनपाल सुनिल पाटील यांनी तक्रारदाराकडे पंचसाक्षीदार यांचे समक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली परंतु वनपाल सुनिल पाटील यांना तक्रादार यांच्या बाबत संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारण्यास टाळटाळ केली.सदर पडताळणी वरुन वनपाल सुनिल पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न होत असल्याने वनपाल सुनिल पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर,पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम,कैलास जोहरे,शरद काटके,भुषण खलाणेकर, भुषणे शेटे,संतोष पावरा,गायत्री पाटील, संदिप कदम,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर आदींनी केले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: