बातमी कट्टा:- पिंपळनेरहून सुरतकडे जाणारा मालवाहू ट्रक चरणमाळ घाटात थेट 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आज दि 31 रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात पाच तासापासून अडकेल्या चालक व सहचालकला नागरिकांनी बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
बोरझर गावातील नागरिकांनी सुमारे 5 तासापासून अडकलेल्या चालक व सहचालक यांना ट्रक खालून बाहेर काढत नवापूर रुग्णालयात दाखल केले.धुळे आणि नंदुरबार सीमेवरील चरणमाळ घाटात पिंपळनेरहून सुरतकडे लाकडी फाळ्या घेऊन जाणारा मालवाहू ट्रक जी.जे.०३, बी. डब्ल्यू ५९ तीव्र उतारावरून येताना 150 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.या अपघातात चालक व सहचालक दोन्ही ट्रकखाली अडकून पडल्याने गंभीर जखमी झाले होते.नवापुर तालुक्यातील बोरझर गावातील पोलीस पाटील भीमा गावित व स्थानिक युवकांच्या मदतीने जखमी चालकांना ट्रक खाली अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आले.दोन्ही जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.