बातमी कट्टा:- धुळे जवळील लळींग शिवारातील डोंगारच्या पयथ्याशी असलेल्या तलावात पोहण्यासाठी उडी घेतलेल्या 17 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार धुळे शहरातील रासकरनगरातील कुंदन किशोर चावरे हा 17 वर्षीय युवक त्याच्या नातेवाईकांसोबत लळींग येथे गेला होता. तेथे देवदर्शनानंतर लळींग डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लहान तलावाजवळ आल्यावर त्याने पोहण्यासाठी त्या तलावात उडी मारली पण खोलीचा कुठलाही अंदाज नसतांना पाण्यात उडी मारल्याने तो तेथे बुडाला त्याचा शोध घेतला असता तो तेथील एका कपारीत मिळुन आला.याबाबत मोहाडी पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.