बातमी कट्टा:- आई वडील दवाखान्यात औषधोपचारा साठी गेले असताना 17 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.सदर घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील पद्मावती नगर मधील श्री साई मित्र आपारमेंट मध्ये उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिरपूर शहरातील पद्मावती नगर येथील श्री साई मित्र आपारमेंट मुकेश भाई क्रिएशन गार्डन मागे प्रतिक्षा अरुण बेलदार वय 17 या मुलीचा गळफास घेतल्याची घटना घडली आहे.आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास अरुण बेलदार हे पत्नीसह दवाखान्यात औषध उपचारासाठी गेली असताना त्यांची 17 वर्षे मुलगी प्रतिक्षा घरीच असतांना या दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास दवाखान्यातून परत आल्यावर घरात सदर मुलीचा ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.सदर मृतदेह खाली उतरवून आतेभाऊ नितेश सुभास कुमावत याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण मालचे करीत आहेत