बातमी कट्टा:- देशाचे राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 18 मोरांचा दुर्दैवी मृत्यू नंतर धुळे येथील वनविभागाचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत अधिकारींना सुचना केल्या आहेत.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे 5 दिवसापूर्वी 12 मोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.एकाच वेळेस 12 मोरांचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना होती. विषारीयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक आंदाज व्यक्त करण्यात येत होता.त्यानंतर आणखी चार दिवसात 6 ते 7 मोरांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
तापी नदीचा परिसर असल्याने व जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने या भागात मोर दिसून येतात. या परिसरात मोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो मात्र अचानक एकाच वेळेस 12 मोरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिक व प्राणीमित्रांनी रोष व्यक्त केला होता. यात आणखी 3 ते 4 दिवसात मोरांच्या मृत्यूचा आकडा वाढल्याने एकुण 18 मोरांचा मृत्यू झाले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पक्षी मोरांचा मृत्यूच्या घटनेच्या 6 ते 7 दिवसानंतर आता कुठेतरी वरीष्ठ अधिकारी एम.एस भोसले वनसंरक्षक धुळे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेची चौकशी करत काही सुचना केल्याचे कळत आहे.त्यांच्या मृत्यूचा अहवाल आला नसला तरी संबधीत अधिकारींनी मृत मोरांच्या घटनास्थळाच्या परिसरात शोध घेऊन मोरांबाबत जनजागृती करण्याचे सांगण्यात आले आहे.