बातमी कट्टा:- वाटणी प्रकरण तयार करून ते तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यासाठी 40 हजाराची मागणी करण्यात आली होती.यावेळी 25 हजाराचा (पहिला हप्ता)लाच स्विकारतांना तलाठी व खाजगी पंटर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली आहे.

तक्रारदार यांची मौजे आच्छी येथील आई व वडीलांचे नावे असलेली शेत जमीनीचे तक्रारदार यांचे भावंडांमध्ये वाटणी प्रकरण तयार करून तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे वाटणी प्रकरण पाठवण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील अमळथे सजाचे तलाठी नवनीत खंडेराव पाटील वय 32 वर्ष यांनी 40 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.आज दुपारी लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता.यावेळी कारवाई दरम्यान 25 हजार रुपयांचा (पहिला हप्ता) स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी खाजगी पंटर संतोष रमेश भदाणे वय 36 रा.आमळथे याच्या हस्ते स्वीकारली,यावेळी लाचलुचपत पथकाने पंच व साक्षीदार समक्ष सापळा कार्यवाही दरम्यान दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण,पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,सहा.सापळा अधिकारी प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.धुळे,यांच्यासह सापळा पथकातील कृष्णकांत वाडीले,राजन कदम,प्रशांत चौधरी, भुषण खलानेकर,भूषण शेटे,गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे आदींनी कारवाई केली आहे.