29 वर्षीय तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीत आढळला मृतदेह …

बातमी कट्टा:- 29 वर्षीय तरुणाचा स्वतःच्या शेतात गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.सचिन लहू पाटील 29 रा विखरण बु असे तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वार्डबॉय लखन गुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शिरपूर तालुक्यातील विखरण येथील सचिन लहू पाटील वय 29 हे सकाळी मुखेड शिवारातील स्वतः च्या शेतात गेले होते.सकाळी शेतात सचिन पाटील हे झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्याचे चुलत भाऊ भटू धर्मा पाटील यांनी 10:30 वाजेच्या सुमारास शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.अमोल जैन यांनी सचिन लहू पाटील यांना मयत घोषित केले.याप्रकरणी वार्डबॉय लखन गुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोना राजेंद्र एंडाईत करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: