बातमी कट्टा:- पोलीस स्टेशनात दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयितांवर कारवाई व्हावी यासाठी 5 हजारांची मागणी करुन 3 हजारांची लाच स्विकारतांना पोलीस हेड काँस्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रादार यांची लहान बहिण हिचे दहा वर्षापूर्वी लग्न झालेले असून तिचा नवरा व सासरचे लोक यांच्याशी त्यांचे वाद सुरु असल्याने तक्रादार यांची बहिण सुमारे एक वर्षा पासून तक्रादार यांचे घरी सोफत राहत आहे. या संदर्भात तक्रारदार यांची बहिण हिने तिचा नवरा ,सासु सासरे,ननंद यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याशरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव जि.जळगाव येथे भांदवी कलम 498 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हा पोलीस हेड काँस्टेबल दिपक देविदास ठाकुर वय 48 यांच्याकडे तपासासाठी आहे. सदर गुन्ह्याचे काय झाले व आरोपींना अटक अधी करणार याबाबत तक्रादार यांनी पोलीस हे काँस्टेबल ठाकुर यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींतावर कारवाई करण्यासाठी तक्रादार यांना 5 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले याबाबत तक्रादार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने चाळीसगाव येथे जाऊन तक्रादार यांची भेट घेऊन दि 30 रोजी तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडे पोलीस काँस्टेबल दिपक ठाकूर यांनी 3000 /- तिन हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करुन लाच स्विकारल्याने लाचलुचपत विभागाच्या पथकाने पोलीस काँस्टेबल ठाकूर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक वुळे विभागाचे पोलीस उट अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण,भुषण खलाणेकर, भुषण शेटे,प्रशांत बागुल,सुधीर मोरे, तसेच राजन कदम,शरद काटके,कैलास जोहरे,संतोष पावरा,गायत्री पाटील, संदीप कदम,रामदास बारेला,जगदीश बडगुजर, प्रविण पाटील, वनश्री बोरसे,रोहिणी पवार आदींनी कारवाई केली आहे.