3 हजाराची लाच स्विकारतांना “तलाठी” जाळ्यात…!

बातमी कट्टा:- महामार्ग प्राधिकरण नवी दिल्ली यांनी नागपूर सुरत महामार्गासाठी संपादित केलेल्या बिलाचे न्यायालयीन लढा सुरु असतांना त्यासाठी वारसांचा चौकशी अहवाल व शेत जमीनीचे सातबारा उतारा लागणार असल्याने तलाठी कडे यासाठी मागणी केली असता तक्रारदाराकडून तिन हजाराची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने तलाठीला रंगेहाथ ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार यांचे वडिलांच्या नावे साक्री तालुक्यातील दहिवेल येथील गट नं 181/2/इ अशी शेत जमीन होती.सदर शेत जमीनीच्या एकुण क्षेत्रापैकी सहाशे चौ.मी क्षेत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नवी दिली यांनी नागपूर सुरत महामार्गासाठी संपादित केली असून सदर संपादित क्षेत्राचा गट नं 181-2/इ/ब क्षेत्र 600 चौ.मी असा स्वतंत्र सातबारा उतारा प्राधिकरणाचे नावे झालेला आहे. सदर क्षेत्राचे संपदनाचे बिल तक्रारदार यांचे वडील ह्यात असतांना त्यांना मिळाले होते.सदरचे बिल तक्रारदार यांना मान्य नसल्याने त्याविरुद्ध तक्रारदार सक्षम न्यायालयात वकीलांचे मार्फतीने अपील दाखल केले होते.तक्रारदार यांचू वडीलांचे मृत्यू पश्चात सदरचे अपील प्रकरण कामासाठी तक्रारदार यांचे वडीलांच्या वारस चौकशी अहवालाची व शेत जमिनीच्या सातबारा उतारा मागणी करिता गेले असता.तक्रारदार यांचे कडेस तलाठी तानाजी धोंडीबा वाजे वय 39 यांनी 7 हजराची लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला तक्रार दिली.याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने दि 28 रोजी पडताळणी केली असता यादरम्यान तलाठी वाजे यांनी 7 हजाराची मागणी केली होती.त्याआधारे लाचलुचपत पथकाने सापळा रचला असता तलाठी वाजे यांनी 3 हजाराची लाच पंचसमक्ष स्विकारली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अपर पोलीस अधीक्षक सतिष भामरे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच यांनी जयंत साळवे,शरद काटके,कैलास जोहरे,राजन कदम,पुरुषोत्तम सोनवणे,कृष्णाकांत वाडिले,भुषण खलाणेकर प्रशांत चौधरी, भुषण शेटे,महेश मोरे,संतोष पावरा,संदिप कदम ,गायत्री पाटील, सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

WhatsApp
Follow by Email
error: