बातमी कट्टा:- तक्रारदाराकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व मोबाईल वर कॉल करुन लाचेची मागणी करत आज दि 8 रोजी 3500 रूपयांची लाच स्विकारतांना कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.याप्रकरणी कनिष्ठ साहाय्यक विरुध्दात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
तक्रारदार हे पंचायत समिती धुळे येथे शाखा अभियंता या पदांवर कार्यरत असुन ते एप्रिल २०२२ पावेतो रत्नपुरा बीट येथे नेमणुकीस होते. सदर कालावधीतील सदर बिटचे विभागीय लेखापरिक्षण (ऑडीट ) झाले होते. सदर झालेल्या लेखा परिक्षणांच्या नावाने बक्षिस म्हणुन पंचायत समिती धुळे येथील बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे हे तक्रारदार यांच्या कडे सुमारे ०८ ते १० दिवसांपासुन वेळोवेळी प्रत्यक्ष भेटीत व मोबाईल वर कॉल करून ३५००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्यांची तक्रारदार यांनी आज रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज दि.०८.०५.२०२३ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कनिष्ठ सहायक श्यामकांत सोनवणे यांनी तक्रारदार यांचेकडे ३५००/- रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द देवपुर पश्चिम पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, प्रशांत बागुल रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रोहीणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.
सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस ” अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.