40 ते 50 लाख किंमतीचे सागवान लाकुड जप्त,महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात तष्करी झाल्याची शक्यता…

बातमी कट्टा:- पुष्पा चित्रपटाप्रमाणे सागवान लाकडाची अवैध तष्करी करणाऱ्या एकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र राज्यातून तष्करी केलेल्या सागवान लाकूड मध्यप्रदेश वनविभागाने ताब्यात घेतले असून चार आयशर भरून लाकुड,लाकडाचे दरवाजे चौकटसह ईतर वस्तू् वनविभागाने जप्त केले आहे.गेल्या 24 तासांपासून याबाबतीत कारवाई सुरु आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शेंधवा (मध्यप्रदेश) वनविभागाचे वनमंडळाधिकारी अनुपम शर्मा यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे शेंधवा वनविभागाच्या धनोरा परिक्षेत्रातील चाचरीया गावात दिनेश शिवनाथ वय 45 यांच्या घराच्या परिसरात अवैध पध्दतीने सागवान लाकुड असल्याची माहिती मिळाली होती.त्या माहिती नुसार दि 27 रोजी वनविभागाच्या पथकाने दिनेश शिवनाथ याच्या घरावर छापा टाकला असता तेथे सुमारे चार आयशर भरुन सागवान लाकूड व लाकुड कटाईसाठी लागणारे साहित्य वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.दि 27 रोजी सायंकाळपासून तर दि 28 रोजी दुपार पर्यंत कारवाई सुरु होती.यात अंदाजे 40 ते 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोन ते तीन वर्ष पुर्वीचे लाकूड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत अनुपम शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहिती नुसार सदर सागवान लाकुड हे महाराष्ट्र राज्यातून तष्करी करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई मणीशंकर मिश्रा जीवनलाल पोलाया, तरूणेन्द्रसिंह,रजनेश त्रिपाठी, विशाल यादव, अर्जुनसिंह चव्हाण, प्रदिप पवार,जितेंद्र पाचोरे, सेवाराम पवार,पुनीत मिश्रा,विकास मालवी, अखीलेश चव्हाण, प्रवीण पवार, कृष्णापाल झालासह ईतर कर्मचारी व चाचरीया पोलीस चौकीचे पोलीस पदाधिकारी व कर्मचारींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: