40 एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील ऊसाला “आग”

बातमी कट्टा:- अचानक लागलेल्या आगीत सुमारे 40 एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे.5 ते 6 शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस जळून खाक झाला असून अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे येथे कापणीला आलेल्या उसाला अचानक भीषण आग लागली. पाच ते सहा शेतकऱ्यांचे सुमारे 40 एकर पेक्षा जास्तीच्या क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मदत कार्य सुरु करत अग्निशमन दलाच्या बंबाने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यावेळात संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: