
बातमी कट्टा:- सुमारे 43 लाख 75 हजारांची लाचेची मागणी करुन प्रथम हप्ता चार लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने तिन जणांना ताब्यात घेतले आहे.चक्क 43 लाख 75 हजारांची लाचेची मागणी केल्याने एकच खळखबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 43 लाख 75 हजार रुपयांची लाचेची मागणी करून चार लाख रुपये रोख स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या नंदुरबार पथकाने कारवाई केली आहे.राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी या गावातील विकास कामांच्या बिल अदा करण्यासाठी अक्कलकुवा येथील जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे, सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे आणि त्यांचा खाजगी पंटर अभिषेक शर्मा या तिघांविरुद्ध ही कारवाई करण्यात आलेली आहे.अभियंता सुनील पिंगळे आणि संजय हिरे यांनी ठेकेदाराने केलेल्या कामांच्या 8 कोटी 45 लाख मधील विकास कामांची उर्वरित 84 लाखाची बिल अदा करण्याच्या मोबदल्यात 43 लाख 75 हजार रुपयांची रक्कम मागितली होती.विशेष म्हणजे यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा देखील केला होता.ठेकेदाराने याबाबत नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती.या बाबत शहानिशा केल्यानंतर नंदुरबार येथे तिघांना चार लाखांची लाच स्वीकारताना पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील कारवाई सुरु आहे.