बातमी कट्टा:-मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गलगत बनावट देशी दारूचा कारखाना मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने उध्दवस्त केला होता.या कारवाईत सुमारे 1 कोटींपर्यंत मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता तर 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने सदर कारवाई केली होती याबाबत मात्र शिरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क स्थानिक पथकाला काही एक माहिती नव्हती याबाबत प्रशासनाने आता या विभागाच्या 5 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून धुळ्याचे विभागाच्या अधिक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक संताजी यांनी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील जिनींग मिल येथे सुरु असलेल्या बनावट देशी दारुचा कारखाना सुरु असतांना छापा टाकला होता.तेथे काम करणारे दोन संशयितांना यावेळी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले होते.
या कारवाई साठी महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक संताजी लाड यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती.दि 9 रोजी पोलीस निरीक्षक संताजी लाड यांनी दुपारी 4 वाजेच्या सुमारास कारवाई केली होती.या कारवाईत सर्व कंपनींच्या दारुचे बॉटलस, झाकनसह स्पिरीटने भरलेले ड्रम,या साठी लागणारे मशनरी, आदींसह सुमारे 80 लाखांपेक्षा जास्तींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

शिरपूर जवळ इतका मोठा देशी दारुचा कारखाना सुरु असतांना मुंबईचे अधिकारी शिरपूर तालुक्यात येऊन कारवाई करत असतांना शिरपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक पथकाला याबाबत कुठलाही सुगावा का नसावा असा प्रश्न सर्वत्र उपस्थित झाला होता.या गुन्ह्यात हलगर्जीपणाला जबाबदार धरून प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांची तडकाफडकी बदली केली आहे.तर निरीक्षक अंकुश सुर्यवंशी,दुय्यम निरीक्षक मधुकर पवार,बी.आर नवले,सहाय्यक उपनिरीक्षक गोळेकर व जवान बोरसे यांचे निलंबन करण्यात आले आहे.