बातमी कट्टा:- बदली झाल्यानंतर अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 6 हजार रूपयांची लाच स्विकारतांना कनिष्ठ साहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.कनिष्ठ साहाय्यक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे ग्रामसेवक असून ते शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी खुर्द येथे कार्यरत होते.तेथून त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांची ग्रामविकास अधिकारी म्हणून शिरपूर पंचायत समिती येथे बदली झाली.दि 18 एप्रिल 2022 रोजी ते कार्यमुक्त झाले.त्यानंतर वेळोवेळी ते त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र मिळणे कामी शिंदखेडा पंचायत समिती येथील कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांची भेट घेत होते.तेव्हा कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे याने तक्रादार यांच्याकडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली असुन त्यांनी तक्रारदार यांना गटविकास अधिकारी श्री.देवरे यांनी अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलविले असुन त्यांच्याशी सदर विष्यावर चर्चा करुन तक्रारदार यांना अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले असल्याची माहिती तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला दुरध्वनी द्वारे दिली.
सदर माहितीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेवून तक्रारची दि 18 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे यांनी तक्रादार यांच्याकडे त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी श्री.देवरे यांच्यासाठी 4 हजार रुपये व स्वतासाठी किरण मोरे यांच्यासाठी 2 हजार रुपये अशी एकुण तडजोडीअंती 6 हजार रुपये पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांना धुळे येथे देण्याचे सांगितले होते.दि 19 रोजी धुळे येथे दत्त मंदिर चौकात पैसे घेऊन अंतिम वेतन प्रमाणपत्र घेण्यासाठी 8:45 वाजता बोलवले होते.त्याप्रमाणे दत्त मंदिर चौकातीव एचडीएफसी बँके जवळ सापळा लावला असता कनिष्ठ साहाय्यक किरण मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 6 हजार रुपये लाच स्विकारतांना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
सदरची कारवाई लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे,तसेच राजन कदम,शरद काटके,कैलास जोहरे,भुषण खलाणेकर,संतोष पावरा, भुषण शेटे,गायत्री पाटील, संदीप कदम,रामदास बारेला,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर,प्रशांत बागुल,प्रविण पाटील, वनश्री बोरसे,रोहीणी पवार यांनी केली आहे.