70 ते 80 फुट खोल दरीत वाहन कोसळल्याने दोन्ही मित्रांचा मृत्यू

बातमी कट्टा:- शिरपूर शहादा रस्त्यावरील तांडे रस्त्यावर 70 ते 80 फुट खोल दरीत चारचाकी वाहन कोसळल्याने वाहनातील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/tjHE2iUdvy8Bqjzq/?mibextid=o9LsNV

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहादा रस्त्यावरील विमानतळ जवळील तांडे रस्त्यावर कंजरबाबा मंदिर जवळ 70 ते 80 फुट खोल दरीत चारचाकी वाहन कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली या अपघातात शिरपूर शहरातील प्रविण शिवाजी पाटील वय 42 आणि प्रशांत(पप्पु) राजेंद्र भदाणे वय 34 या दोन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

बघा Facebook video
https://www.facebook.com/share/v/tjHE2iUdvy8Bqjzq/?mibextid=o9LsNV

प्रविण पाटील आणि प्रशांत भदाणे दोन्ही मध्यरात्री उशीरा घरी आले नसल्याने त्यांचे कुटुंबीय त्यांना मोबाईल द्वारे संपर्क करत होते.पहाटे पर्यंत दोन्ही घरी पोहचले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता.त्यांच्या कडे असलेली काळ्यारंगाची चार चाकी वाहन दरीत कोसळल्याचे आढळून आले घटनास्थळी धाव घेतली असता प्रशांत आणि प्रविण या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.तर चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता.प्रशांत भदाणे हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,पत्नी आई वडील भाऊ असा परिवार होत तर प्रवीण पाटील हे भाजपचे पदाधिकारी व इंदिरा हॉस्पिटल येथे कॅन्टीनचे कामे सांभाळत होते. त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी आई,वडील,भाऊ,वडील असा परिवार होत.

📸 Watch this video on Facebook
https://www.facebook.com/share/v/tjHE2iUdvy8Bqjzq/?mibextid=o9LsNV

घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मित्रांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती.मध्यरात्रीनंतर अंधारात हा दरीत वाहन कोसळून अपघात झाल्याने रात्री कोणालाही या घटनेची माहिती मिळाली नव्हती.

WhatsApp
Follow by Email
error: