बातमी कट्टा:- 9 वर्षीय मुलीवर नातेवाईक असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत मुलीच्या आईकडून पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील आखाडे शेत शिवार परिसरात 9 वर्षीय बालिकेवर वर्धाने येथील 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा पिडीत बालीकेच्या आईने निजामपुर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.आई वडील जैताणे येथे गेले होते ते सायंकाळच्या सुमारास परत आले तेव्हा मुलीच्या आईला नातेवाईक असलेला 25 वर्षीय तरुण 9 वर्षीय मुलीशी शारीरिक संबंध करतांना आढळून आला. मुलीची आई आल्याचे बघुन तो तेथून फरार झाला. याबाबत मुलीच्या आईने निजामपुर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होऊन चौकशी करण्यात आली होती. संशयित फरार असून पोलीसांकडून त्याचा शोध सुरु आहे.