बातमी कट्टा:- धुळे शहरातील अवधान या गावात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असून या भागातील लोकांची पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होते.त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार फारुक शाह यांच्याकडे मागणी केली होती कि, अवधान शिवारातील तलाव/ बंधारा खोलीकरण केल्यास या भागातील पाणी टंचाई दूर होईल त्या अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन या भागातील लोकांची मागणी मंत्री महोदयांना अवगत करून दिली त्या मागणीला मंत्री जयंत पाटील यांनी सकरात्मक प्रतिसाद देत तलाव खोलीकरणासाठी दगडी पिंचींग करून पाणी पिण्या योग्य करण्यासाठी निधी देऊ असे आश्वासन दिले आहे.

आमदार फारूक शाह यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, धुळे शहरा लगत अवधान या गावात व परिसरात अनेक वर्षांपासून दुष्काळ असून अवधान हे गाव दुष्काळ ग्रस्त गाव असल्याने येथे उन्हाळ्यात प्रचंड पाण्याची टंचाई निर्माण होते आणि नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते.अवधान गावापासून जवळच असलेला एक जुना तलाव आहे परंतु आजच्या परिस्थितीत फक्त पावसाळ्यातच तेथे पाणी साचते उन्हाळ्यात तो पूर्णपणे कोरडा होऊन जातो.येथे समोरच्या बाजूला असलेल्या एम. आय.डी. सी. तलावाचे पाणी परिसरात केमिकल युक्त असल्याने ते पिण्या योग्य नाही.या तलावाचे खोलीकरण केल्यास व आजूबाजूला दगडी पिचिंग करून वाहून जाणारे पाणी अडविल्यास उन्हाळ्यात सुद्धा येथे पाणी साचून राहील आणि स्थानिक नागरिकांची पाणी टंचाई कायमची दूर होईल. त्या अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन या परिस्थिती ची कल्पना देत अवधान शिवारातील तलाव/ बंधारा खोलीकरणासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे. सदर तलाव/ बंधारा खोलीकरणाचे काम झाले तर या संपूर्ण भागातील पाणी टंचाई कायमची दूर होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.