बातमी कट्टा:- धुळे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धुळे श्री विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राअसुअ सन 2021-22 अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत सोयाबीन महाडीबीटी अंतर्गत निवड झालेल्या शिरपूर तालूक्यातील सावळदे येथील शेतकरी विजय महारु महाजन, दर्शन पाटील, हेमंत पाटील, प्रमोद पाटील, मंगेश महाजन, सुभाष पाटील,रवींद्र जाधव,दीपक पाटील, यांना सोयाबीन बियाणे महाबिज मार्फत खरेदी करण्यासाठी परवानाचे वाटप तालुका कृषी अधिकारी अनिल निकुंभ आणि मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना परिस्थिति मध्ये बांधावर खते व बियाने वाटप मोहीम अंतर्गत शेतकरी गट प्रतिनिधि मार्फत शेतकर्यांनी बियाने उचल केले.या प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी विशाल मोटे,आर डी मोरे, योगेश सोनवणे कृषी सहाय्यक शिवराज माळी व सावळदे येथील सचिन राजपूत हे उपस्थित होते.सदर योजने अंतर्गत गळीतधान्य बियाण्यासाठी 76,कडधान्य बियाण्यासाठी 18 आणि मका बियाण्यासाठी 48 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. तरी कृषी विभागामार्फत निवड झालेल्या शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर बियाणे परवाने तालुका कृषी अधिकारी शिरपूर येथून प्राप्त करून घ्यावेत आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतरच बियाने उगवन क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करून पेरणी करावी.असे आवाहन कृषि विभाग मार्फत करण्यात आले.
