बातमी कट्टा:- जागतिक पर्यावरण दिवस हा सक्तीचा ‘नो व्हेहिकल-डे’ पाळण्याचे आदेश व आव्हान करावे यासाठीचे अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेतर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.या मागणीला आता पोलीसांकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली असून जागतिक पर्यावरण दिन निमीत्त दि 5 रोजी “नो-व्हेहीकल डे” पाळण्याचे आव्हान नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

दि 5 रोजी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो यासाठी जागतीक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येत असतात.मात्र पर्यावरण दिनानिमित्त फक्त सायकल किंवा इलेक्ट्रीक वाहनाचा वपार करावा यासाठी सक्तीचा ‘नो व्हेहिकल-डे’ पाळावा अशी मागणी अखिल भारतीय मानव कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीसिंग राजपूत (राणा ) यांच्याकडून करण्यात आली होती.या मागणीला पोलिसांनी सकारात्मकता दाखवत नंदुरबार पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी नो व्हेहीकल डे पाळण्याचे आव्हान केले आहे. पत्रकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम साजरे करण्यात येतात.यात प्रामुख्याने वृक्षारोपण आणि आदी सामाजिक उपक्रम राबवले जातात.सामाजिक संस्था आणि पर्यावरण मित्र यांच्याकडून हे उपक्रम राबविण्यात येत असेल तरी वाहनबंदीचे उपक्रम मात्र राबविले जात नाही.यात यंदा दि ५ जून रोजी नागरिकांनी ‘नो व्हेहीकल डे’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कारणा.शिवाय कोणीही पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करू नये,ज्यांना आवश्यक आहे, त्यांनी सायकल किंवा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जनतेला आव्हान केले आहे .
