आरोग्य हीच संपत्ती !!!

संपूर्ण जगभर कोरोना या आजाराचे थैमान सुरू आहे. आपल्या भारत देशात देखील तेवढ्याच जास्त प्रमाणात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तरीदेखील काही लोक नियमांचं पालन करत नाहीत, त्याची खंत वाटते! पण आता सर्वांना एक गोष्ट कळायला हवी की, आपल्याकडे कितीही संपत्ती असली तरी ती बऱ्याचदा निकामी ठरते .

सध्याच्या परिस्थितीत आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे, म्हणून आपण आपल्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी !!जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळा रुग्णालयांच्या पायऱ्या चढाव्या लागतील. यापुढे तरी प्रत्येकाने आपल्या तंदुरुस्तीवर जास्त भर द्यायला हवा, म्हणजेच आपली “फिटनेस” चांगली राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करायला हवा, कारण आता सर्वांनाच कळून चुकले की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे .अनेक वेळा पैसा देखील काही कामाचा नसतो.
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या चांगली ठेवावी. दिवसाची सुरुवात व्यायामा पासून करावी. तसेच प्रत्येकाने चांगला सकस आहार घ्यावा .कारण जर आपण हे सर्व पालन केले आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच आपले शारीरिक आरोग्य देखील चांगले राहील, तसेच आपली मानसिकता देखील चांगली राहील .आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जर का चांगले राहिले तर आपली प्रतिकारशक्ती नक्कीच चांगली असणार यात काही शंका नाही !! आणि जर का आपली प्रतिकारशक्ती चांगली असली तर आपल्याला अनेक आजारांना आपल्यापासून लांब ठेवण्यात यश मिळेल. सध्याच्या स्थितीत आरोग्याला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झालेल आहे.सध्या माझा अनुभव असा आहे की अनेक लोक लाखो रुपये आपल्या सोबत घेऊन फिरत आहेत,तरीदेखील त्यापैकी काहींना सर्व प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकत नाहीयेत,काही ठिकाणी इंजेक्शनचा तुटवडा, तसंच ऑक्सिजनचा तुटवडा,व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा,अशा अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे .या सर्व समस्यांपासून जर आपल्याला स्वतःला लांब ठेवायचे असेल, तर आपण जास्तीत जास्त भर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर द्यावा हेच मी म्हणेल !!! कारण पैसा फारसा उपयोगी पडत नाही ,हे आता सिद्ध झालेल आहे.अनेकदा पैसा आपलं काम करत असतो,पण सध्याच्या स्थितीत अनेक पैसेवाले लोक देखील अनेक समस्यांना सामोरं जाताना दिसत आहेत ,म्हणूनच प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जास्तीत जास्त चांगलं कसं राहील याकडे लक्ष द्यावे.त्यासाठी काय करता येईल त्याची दिनचर्या बनवून ठेवावी ,आणि त्याचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून आपल्याला आपल आरोग्य चांगले ठेवण्यात नक्कीच फायदा होईल. कुठल्याही प्रकारचा त्रास झाल्यावर नजीकच्या दवाखान्यात किंवा सरकारी दवाखान्यात लवकरात लवकर जावे म्हणजे पुढच्या अडचणी येणार नाहीत. आज सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण पैशांना जास्त महत्त्व न देता आपल्या आरोग्याला जास्त महत्त्व द्यावे व आरोग्य जास्तीत जास्त चांगलं कसं राहील त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत मार्गक्रमण करावे .दुसऱ्यांच्या अडचणीत आपण सहकार्य केल्याने देखील आपले मानसिक आरोग्य चांगले राहू शकते .त्याचं एक वेगळं समाधान मिळत असते, म्हणूनच आपण सर्वांनी आरोग्याला जास्तीत जास्त महत्त्व द्यावे.आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे मात्र आता शतप्रतिशत सिद्ध झालंय!!!
डॉ गोकुलसिंह गिरासे,क्रिकेट समालोचक
९५९४९७७५७७
Email [email protected]

WhatsApp
Follow by Email
error: