बातमी कट्टा: धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतपंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत रविवार 6 जून 2021 रोजी शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेत रविवार 6 जून 2021 रोजी सकाळी 9 वाजता शिवस्वराज्य दिनाचा कार्यक्रम होईल. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास,बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे ऑनलाइन उपस्थित राहतील. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष कुसुमताई निकम, शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती मंगलाताई पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती मोगराताई पाडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.सकाळी 9 वाजता शिवस्वराज्य गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात येईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी कळविले आहे.