बातमी कट्टा- भूपेशभाई ग्रीन आर्मी च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनी वृक्ष वाढदिवस साजरा करण्यात येऊन गेल्या वर्षाप्रमाणे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
शहरातील सुभाष कॉलनी येथील बनुमाय प्राथमिक शाळेसमोर भूपेशभाई ग्रीन आर्मी व सुभाष कॉलनी मित्र परिवार यांच्या वतीने शनिवारी दि. ५ जून २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता वृक्षारोपण एक वर्षे पूर्ती बद्दल वटवृक्ष पूजा करुन प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला व वृक्षारोपण देखील करण्यात आले.
आपण सर्वजण वाढदिवस साजरा करतो तो स्वत:चा, घरातील लहानथोरांचा, प्रतिष्ठित व्यक्तीचा, राजकीय व्यक्तीचा, मित्र, मैत्रिणी, आई, वडील कुटुंबातील सर्व व्यक्तींचा वाढदिवस साजरा होताना दिसतो. पण भूपेशभाई ग्रीन आर्मी ने मात्र साकारला एका वटवृक्षाचा आगळावेगळा वाढदिवस. अन् तोही मोठ्या थाटामाटात. वटवृक्षाचा प्रथम वाढदिवस वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याकरिता साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, फॉरेस्ट अधिकारी जाधव सर, ऍड. सुरेश सोनवणे, पी. डी. पाटील सर, राजपूत सर, वन विभागाचे अधिकारी नितीन बोरकर, कक्कूबेन पटेल, सौ. कृतिबेन पटेल, कुु. द्वेता दीदी पटेल, ऍड. सुरेश सोनवणे, ऍड. निखिल सोनवणे, सुभाष कुलकर्णी, आर. आर. माळी, शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, मनोज पटेल, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, सुभाष कॉलनी येथील रहिवासी, नागरिक, महिला उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते विधिवत वृक्ष पूजा करण्यात आली. तसेच सौ. कृतिबेन पटेल, कुु. द्वेता दीदी पटेल यांच्या हस्ते भूपेशभाई ग्रीन आर्मी मोहिमेचा वाढदिवस बलून हवेत सोडून साजरा करण्यात आला. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पिंपळ रोप देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात सुभाष कुलकर्णी म्हणाले, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन मोहीम शहरात व तालुक्यात यशस्वी झाली आहे. तसेच आदिवासी ग्रामीण भागात भगिनींसाठी द्वेता दीदी चे योगदान व कार्य मोठे आहे. कोरोना मुळे अनाथ मुलामुलींचे शिक्षण द्वेता दीदी करणार आहे, ही फार मोठी अभिमानास्पद बाब आहे.
व्यासपीठावर उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, फॉरेस्ट जाधव सर, ऍड. सुरेश सोनवणे, पी. डी. पाटील सर, राजपूत सर विराजमान होते. यावेळी महिला भगिनी यांच्या वतीने भूपेशभाई पटेल यांना निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकारी अमोल बागुल मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, शिरपूर शहराचा नावलौकिक सर्वत्र असून पटेल परिवाराच्या परिश्रमातून हरित शिरपूर निर्माण झाले आहे. वृक्ष जतन करण्याचे व्रत अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी १९८५ पासून अंगिकारले आहे. सुमारे १.२५ लाख कडुलिंब शिरपुरात भाईंमुळे जगले व विशाल रुप धारण केले आहे. आज उत्साहपूर्ण वातावरणात झाडांचा वाढदिवस साजरा होतोय व कुटुंबातील सदस्य समजून झाडांची जतन होतेय ही आनंदाची बाब आहे.
तहसीलदार आबा महाजन म्हणाले, झाडाचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम पाहून आनंद होत आहे. शिरपूर तालुक्यात भूपेशभाई ग्रीन आर्मी ची वृक्षारोपण मोहीम व पटेल परिवाराने केलेलं कार्य अप्रतिम आहे.
ऍड. सुरेश सोनवणे म्हणाले, शिरपूर सर्वांग सुंदर करण्यासाठी भाईंनी केलेले प्रयत्न काम अभिमानास्पद आहे. नैसर्गिक ऑक्सिजन देणारा एकमेव स्रोत झाड असल्याने सर्वांनी वृक्षारोपणावर भर द्यावा. लाखो रुपये खर्चून लोक घरे बांधतात पण झाड लावत नाहीत, सर्वांनी गांभीर्यपूर्वक घ्यावे.
कार्यक्रमाला सुभाष कॉलनी परिसरातील नागरिक, महिला भगिनी, युवक, भुपेशभाई ग्रीन आर्मी चे कार्यकर्ते धीरज माळी, बापू महाजन, बकुल अग्निहोत्री, रवी पाटील, ललित फिरके, बंडू पाटील, जितेंद्र शेटे, गिरीश सनेर, हरपाल राजपूत, निलेश माळी, योगेश राजपूत, मनोज पटेल, मनोज पाटील, अनुप बाविस्कर, संदीप पाटील, निलेश दायमा, अतुल जैन, बाबाजी महाजन, राजेंद्र भामरे, अजित परमार, चिराग पाटील उपस्थित होते.
गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी देखील वड, उंबर, बेल, करंज,सिशु, कौठ, जांभूळ, बांबू, चिंच हे पर्यावरणाला आवश्यक झाडांची लागवड करण्यात आली.