बिबट्याने हल्ला करत युवा शेतकऱ्याला केले ठार…

बातमी कट्टा:- रात्री पासून शोध सुरू असतांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.या मृत्यूदेहावरील शरीराचे काही भागाचे लचके तोडल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचे प्रथमदर्शनी उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे.

साक्री व बागलान तालुक्यातील सिमेभागावरील पिसोळबारी घाटात जायखेडा पोलीस स्टेशन हद्दी परिसरातील वनहद्दीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

नवीन आर.ओ.फिल्टर बसविण्यासाठी किंवा दुरुस्ती साठी संपर्क करा 9404560892

बागलाण तालुक्यातील दरेगाव येथील युवा शेतकरी नंदकिशोर धोंडू पवार हे आपल्या मोटरसायकलीने सायंकाळी दिघावे येथे जाण्यासाठी निघाले होते.या रस्त्यावरील पिसोळबारी घाटात पाळत ठेऊन बसलेल्या बिबट्याने नंदकिशोर पवार यांच्यावर हल्ला करत त्यांना मोटरसायकली वरुन खाली पाडले व तेथून बिबट्याने फरफटत नंदकिशोर पवार यांना जंगलात नेले.

सायंकाळ पासून घराबाहेर निघालेले नंदकिशोर पवार घरी आले नसल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.रात्रभर शोध घेऊन देखील नंदकिशोर पवार कोणाला मिळुन आले नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.यावेळी पिसोळबारी घाटात नातेवाईक शोध घेत असतांना यावेळी त्यांना नंदकिशोर यांचा मृतदेह आढळून आला.

यावेळी मृतदेहाच्या शरीरावरील काही भागाचे लचके तोडल्याचे दिसून आले आहे घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व जायखेडा येथील पोलीस अधिकारी व साक्री पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक निकम दाखल झाले.यावेळी मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविण्यात आला.प्रथमदर्शनी नंदकिशोर पवार यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्यात आल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: