तापी नदीपात्रात चोपडा तालुक्यातील महिलेचा मृतदेह…

बातमी कट्टा:- तापी नदीपात्रात चोपडा येथील 48 वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगतांना सापडला असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवीन आर.ओ फिल्टर बसविण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी संपर्क करा 9404560892

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार चोपडा तालुक्यातील कुसूंबा येथील सरलाबाई नानावटी पाटील या शनिवारी औरंगापूर ता.अमळनेर येथे जाण्यासाठी चोपडा तालुक्यातील गलंगी फाट्यावर गेले होते.

मात्र शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील पोलीस पाटील यांनी सुकवद शिवारातील तापी नदीपात्रात महिला तरंगतांना दिसत असल्याची माहिती शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे कळवले त्यानंतर रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला.याबाबत चोपडा तालुक्यातील कुसूंबा येथील नंदलाल पाटील यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: