बातमी कट्टा:- कर्जाला कंटाळून विषारी औषध घेऊन 50 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे.

मिळलेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनीत राहणारे मिलींद रघुनाथ पाटील (राजपूत) वय 50 यांनी स्वताच्या नुतनीकरण इमारतीत सकाळी 10 वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केरुन आत्महत्या केली.घटनेची माहिती प्राप्त होताच नगरसेवक चंदनसिंग राजपूत यांनी मिलींद पाटील यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी डॉक्टरांनी मिलींद पाटील यांना मृत घोषीत करण्यात आले.
मिलींद पाटील यांचे मुळ गाव शिरपूर तालुक्यातील वाठोडे येथील असून त्यांचा शेती व्यवसाय होता तर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु करण्यात आला होता.मिलींद पाटील राजपूत यांच्या कर्ज असल्याने कर्जपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईक यांच्याकडून सांगण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी पत्नी असा परिवार होत.