बातमी कट्टा:- जिल्ह्यातील कोरोना मुक्त गांवाच्या
सरपंचासमवेत राज्याचे मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला.
शिरपूर तालुक्यातील बोरगाव, जळोद व हिंगोणीपाडा या गावांचा समावेश आजच्या व्हीडिओ कॉन्फरन्स च्या संवादासाठी करण्यात आला होता. पैकी तालुक्यातील बोरगाव चे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया हे कॉन्फरन्स ला उपस्थित होते.

साक्री तालुक्यातील कासारे येथील सरपंच विशाल देसले, धुळे तालुक्यातील नांदरे येथील सरपंच अनिल पाटील यांची पण उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना उद्देशून म्हटले की आज महाराष्टातून कोरोना हद्दपार होत आहे,कोणी मला श्रेय देत असेल तर ते माझे मुळीच नाही.जसे गाव परिसरात बहारदार झाडे डोलत असतात,छान छान फुलांनी नटलेले झाड हे वर वर जरी मोहक दिसत असले तरी ते त्याचा खोलीत गेलेल्या मुळांमूळे टिकून असतात, तसेच सर्व सरपंच महाराष्ट्रासाठी तुम्ही मूळा सारखे खंबीर उभे आहात आणि तुमच्यामुळेच महाराष्ट्राला बहार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वाण्मयी सी मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए जी तडवी,सह गट विकास अधिकारी प्रकाश महाले उपस्थित होते.